गर्द वनराईतला तो वड खुरटलेला कुढतो मनात,
"रात्रीपासून सकाळपर्यंतच्या प्रवासात
कधीकधी गर्तेत प्रशांत सागराच्या
सूर्य अडकून बसतो माझ्या वाटेचा.
न सरणाऱ्या रात्रीत मुळा-पारंब्यातला जोरच जातो
आणि मुळांखालचा खडक अभेद्य वाटू लागतो."
आठवतो तो मग ते पांथस्थ वनराईत आलेले
खुरटेपणावर त्याच्या आणि कुत्सित हसलेले.
फांद्या एकमेकींवर घासतो आणि वाट पाहतो,
कधी एक ठिणगी पडेल आणि ईर्ष्या त्याची धडधडून पेटेल.
जाळेल त्यालाही ती आतून त्याची त्यालाही कल्पना आहे
पण रात्र सरेपर्यंत जाळण्यासारखी तेवढीच एक गोष्ट उरली आहे.
No comments:
Post a Comment